चिपळुणातून ७३ लिटर डिझेलची चोरी
चिपळूण : शहरातील खंड येथील साधना बिल्डर्सच्या धवल व्यापारी संकुल येथील कार्यालयातून ७ हजार २२७ रुपये किंमतीचे ७३ लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सोमवारी गोपाळ रामलू डोबाली (भिवंडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद साधना बिल्डर्सचे संचालक वीरधवल सिताराम घाग (७२, चिपळूण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीरधवल घाग यांच्या मालकीचे असलेल्या साधना बिल्डर्सचे धवल व्यापारी संकुल येथील कार्यालयामध्ये गोपाळ डोबाली हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने साधना बिल्डर्सच्या नावे खरेदी केलेल्या १७३ लिटर डिझेल पैकी ७ हजार २२७ रुपये किंमतीचे ७३ लिटर डिझेल चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घाग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोपाळ डोबाली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.