मद्यपान करुन गैरवर्तन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः मद्यपान करुन शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मोठमोठ्याने ओरडून हातवारे करुन गैरवर्तणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादा लहानु पवार (वय ५४, रा. आरोग्य मंदिर, शासकीय वसाहत, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) दुपारी एकच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या आवारात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दादा पवार हा पोलिस ठाण्याच्या आवारात मद्यपान करुन आरडाओरडा करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.