निष्काळजीपणे वाहन चालविले ; चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील खेडशी-गयाळवाडी येथे मद्यपान करुन इतरांना धोका निर्माण होईल होईल असे वाहन चालविल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रझीम ईब्राहिम शेख (वय २९, रा. पुनस, ता. लांजा, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास रत्नागिरी ते हातखंबा मार्गावरिल खेडशी-गयाळवाडी एसटी स्टॉप येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रझीम शेख याने निष्काळजपणे मोटार चालवून इतरांना धोका निर्माण होईल असे वाहन रस्त्यावर चालविले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.