गोडावूनमध्ये धान्य खाली करताना चक्कर आलेला हमालाचा मृत्यू
रत्नागिरी ः धान्याच्या गोडावून मध्ये काम करणाऱ्या हमाल धान्यांची गाडी खाली करत असताना चक्कर आली उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकाश लक्ष्मण पाटील (वय ४३, रा. इतरगी इक्केरी ता. बेळगाव, कर्नाटक सध्या एमआयडीसी रत्नागिरी) असे मृत हमालाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १०) दुपारी पावणे चारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रकाश पाटील हे एमआयडीसी येथे धान्याच्या गोडावून मध्ये धान्याची गाडी खाली करत असताना अचानक त्यांना चक्कर आली. तात्काळ उपचारासाठी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.