रत्नागिरीत सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
‘समान काम, समान वेतन’ देण्याची मागणी
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “समान काम समान वेतन” मिळण्यासाठी धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी साधारणतः जिल्ह्यातील एकूण 72 सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. समान काम समान वेतन या तत्त्वाप्रमाणे महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळण्यासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. आमची न्याय मागणी लवकरात लवकर मंजुरी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालयाचे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिलेली आहे. त्या अनुषंगाने समान काम समान वेतन या धोरणानुसार दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करावी याकरिता आपण तसेच महासंघातील सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. परंतु आपल्या प्रयत्नाला अजून पर्यंत पाहिजे तसे यश आलेले नाही. त्यामुळे आपणाला धरणे आंदोलन तसेच उपोषण व बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले.
दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांना धरणे आंदोलन करिता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांचे कार्यालय सकाळी १०.०० वाजता ते 6.00 वा. पर्यंत सेवा निवृत्त हजर होते.

विजय चव्हाण
कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ , श्री आर व्ही पाटील, माजी अध्यक्ष माजी रत्नागिरी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना
चंद्रशेखर भागवत
सौ. ए. ए. कोठावळे
ए. व्ही खानविलकर
राजन शिंदे
संजय सनगरे
चंद्रशेखर पाटील
विरेंद्र गडवी
राजेश ना. सुवरे
अविद्र शिंदे
आसिफ मुन्शी
विजय जोशी
सुनिल पवार
सौ मांडवकर
राजन साळवी
सौ नेहा पाटील
सौ संध्या जोशी
संजय पोवार
सौ. पाटणकर
सौ के. के. गानू
सौ एम एस भावे
सौ धुळप
श्रीमती सुरुची सावंत
सौ. एस व्ही पुरोहित
सौ ए. ए. नलावडे
एस. पी. जाधव
बंटी शिवलकर
पी. जी. टाकळे
नितीन जी. नार्वेकर
सौ. समीक्षा मुळ्ये.
अनिल सावर्डेकर
व्ही. एस. कावतकर
सौ नेहा कजबजे
रवी कदम
के. डी. चव्हाण
पी. डी. सातोपे
उत्तम नलावडे
अन्य जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.