सावर्डे येथील अपहरण प्रकरणी तरुणाला कोठडी
चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथून एका १३ वर्षिय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या त्या तरुणाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
९ नोव्हेंबर रोजी सावर्डे येथून एका अल्पवयीन मुलीचे तरुणाने अपहरण केल्याची घटना घडली होती. यानंतर या मुलीच्या शोधासाठी पोलीस यंत्रणेने तपासाची चक्रे गतिमान करून शोधमोहीम सुरु केली. अखेर शुक्रवारी तीला मुंबई-अंधेरी येथून ताब्यात घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. अपहरण प्ररकणी संबंधित युवकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण करुन त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाला शनिवारी येथील न्यायालयात हजर केले होते.