गयाळवाडी येथून दुचाकी पळविली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः गयाळवाडी येथील बिल्डिंगच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) ला दुपारी दोन ते पावणे तीन च्या सुमारास गयाळवाडी येथील जितेंद्र साळवी यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हनुमंत देवाप्पा पाटील (वय ३४, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी मुळः किरहर्षी पो. हलगा, ता. खानापूर, जि. बेळगाव -कर्नाटक ) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ एआर ०९३०) ही जितेंद्र साळवी यांच्या बिल्डींगच्याखाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी हनुमंत पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.