
सोमेश्वर येथील वृद्धेचा पोटदुखीमुळे मृत्यू
रत्नागिरी : पोटदुखीने त्रस्त वृद्धेला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शालिनी शंकर मयेकर (वय ६५, सोमेश्वर, रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) पहाटे चारच्या सुमारास कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शालिनी यांच्या पोटात दुखू लागल्याने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले होते. उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण – मोलिस ठाण्यात खबर देण्यात आली.