दिल्लीतील विद्यार्थी मारहाण प्रकरणी रत्नागिरीत हजारो तरुण रस्त्यावर; निघाला अतिविराट मोर्चा
रत्नागिरी
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारी धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर दिल्लीत सुरू असलेले आंदोलन अमानुषपणे चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुरुवारी सकाळी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे हजारो युवक एकवटले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस बळाच्या वापराचा व दडपशाहीचा तीव्र निषेध करत गुरुवारी सकाळी अकरा वाजता मारुती मंदिर येथून अतिविराट मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात रत्नागिरीतील तरुण, तरुणी आणि पालकवर्ग सहभागी झाला होता. अडीच ते तीन हजार आंदोलकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मारुती मंदिर येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय सरकार आणि नीट पेपरफुटी प्रकरणी जोरदार घोषणा करण्यात आल्या.

