लांजातील वेरळ घाटात कारच भीषण अपघात; दोघे जखमी
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटात शनिवारी दुपारी कार पलटी होऊन अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील दोघेजण जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबईच्या दिशेने जात असलेली कार वेरळ घाटातील रम्बलिंग गतिरोधकावरून जात असताना अचानक घसरली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली. शनिवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातग्रस्त कारचा क्रमांक MH 47 CD 1463 असून, पलटी झाल्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कारमधील दोघांना अपघातात दुखापत झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात घडलेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ चर्चा सुरू होती.