खंडाळा येथे देशी दारुच्या बाटल्या जप्त ; एकावर गुन्हा
रत्नागिरी, : जयगड सागरी पोलिसांनी वरवडे नाका येथील एका चिकन सेंटरच्या पाठीमागील बाजूस कारवाई करून ३ हजार ८४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त केल्या. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदरअली इस्माईल कुरेशी (वय ५९, रा. खंडाळा, कांबळेलावणगण रोड, केदार यांच्याकडे भाड्याने, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा च्या सुमारास वरवडेनाका येथील एका चिकन सेन्टरच्या पाठीमागील बाजूस निदर्शनास आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हैदरअली कुरेशी यांच्याकडे विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे संत्रा जीएम ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ सीलबंद प्लास्टिक बाटल्या मिळून आल्या. या दारूची किंमत ३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल रेश्मा चौधरी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशय़िताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.