श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथे लोककला उपक्रमांतर्गत पोवाड्याचे जोशपूर्ण सादरीकरण!
रत्नागिरी, दि. २४ ऑक्टोबर २०२६ :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, झाडगाव – रत्नागिरी येथे आज शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी लोककला उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा जपणाऱ्या पोवाडा या शाहिरी कलेचे जोशपूर्ण सादरीकरण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची, शूरवीरांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी परंपरेची ओळख करून देणारी पोवाडा ही लोककला विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची माहिती मिळाली. तसेच शौर्य, पराक्रम, देशप्रेम आणि स्वाभिमान या मूल्यांची प्रेरणा मिळाली.
लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असून, पोवाड्यासारख्या पारंपरिक शाहिरी कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिरुची निर्माण होण्यास मदत होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच आपल्या समृद्ध लोकपरंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याची जाणीव निर्माण होते.
या प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री ए. डी. सुतार सर, कला शिक्षक श्री एन. व्ही. जाधव सर, श्रीमती करंबेळकर मॅडम, श्री सावंत सर, श्री सनगरे सर, श्री फगरे मामा तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जपण्यासाठी शाळेमध्ये अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.