जिल्हा रुग्णालयात प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी ः तब्बत बरी नसलेल्या प्रौढाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. गणेश पांडुरंग सुपल (वय ५२, रा. पतीत पावन मंदिरचे मागे, फाटक हायस्कूल समोर रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.२२) अकराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश सुपल यांची तब्बेत बरी नसल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.