मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ जवळ भीषण अपघात; रिक्षातील पाच जण गंभीर जखमी
रत्नागिरीतील रुग्णालयात उपचारासाठी हलविले; जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश
राजापूर, प्रतिनिधी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील उतारावर रिक्षाला मागून येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी रिक्षा मुंबई-गोवा महामार्गावरील वाटूळ येथील उतारावरून जात असताना मागून येणाऱ्या इनोव्हा कारने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.