गांजा सेवन करणाऱ्यावर तरुणावर गुन्हा
गुहागर नवानगर जेटी येथील घटना
गुहागर : नवानगर जेटीलगत असलेल्या प्रवासी पिकअप शेडमध्ये गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी एका ३० वर्षीय तरुणाविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अभिजित नागेश पालशेतकर (वय ३०, रा. धोपावे विघ्नहर्तावाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दाभोळ खाडी किनारी नवानगर जेटीलगत असलेल्या प्रवासी पिकअप शेडमध्ये घडली. आरोपी अभिजित पालशेतकर हा शेडमधील कठड्यावर बसून गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
यानंतर त्याची गुहागर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर संबंधित इसमाच्या श्वासास अंमली पदार्थाचा वास येत असल्याचा प्राथमिक अहवाल दिला. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल राहुल रमेश पवार (वय ३०, नेमणूक गुहागर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलीस ठाण्यात ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट १९८५ मधील कलम ८(क) व २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.