श्वासनाच्या त्रासाने वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुरेखा महिपत भुते (वय ८०, रा. भगवतीनगर, भुतेवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा भुते यांना दम्याचा त्रास होता. सोमवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.