रत्नागिरीत गणेश मंडपातील चांदीचे ताट चोरीला
गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याचा हात साफ ; शहर पोलिस ठाण्यात अज्ञाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, : शहरातील मारुती मंदिर सर्कल परिसरात असलेल्या श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात चोरीची घटना घडली आहे. श्री सत्यनारायणाच्या पूजेदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पूजेसाठी ठेवलेले चांदीचे ताट चोरून नेले. अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी (ता. २३) सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मारुती मंदिर सर्कल येथे गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यात आला आहे. यंदाही या मंडपात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. बुधवार मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. पूजेसाठी गणपतीच्या मूर्तीसमोरील भागात वर्णन केलेले चांदीचे ताट ठेवण्यात आले होते. यावेळी मंडपात भाविकांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांच्या नकळत चांदीचे ताट चोरून नेले. पूजा सुरू असताना ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमरेश सुरेश पावसकर (वय ४४, रा. बी/११, शंखेश्वर मधुबन, बॉडींग रोड, माळनाका, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) तसेच भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडपात पूजेच्या वेळी झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. चोरीस गेलेल्या चांदीच्या ताटाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याचा हात साफ ; शहर पोलिस ठाण्यात अज्ञाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ता. २४ : शहरातील मारुती मंदिर सर्कल परिसरात असलेल्या श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात चोरीची घटना घडली आहे. श्री सत्यनारायणाच्या पूजेदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पूजेसाठी ठेवलेले चांदीचे ताट चोरून नेले. अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.