चिपळूणमध्ये परप्रांतीय तरुणीची आत्महत्या
खेर्डीत घेतला गळफास
चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील खेर्डी भरणवाडी येथे एका ३३ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीमा देवी (वय ३३, मूळ रा. चिरगाव, मोठ, झांसी, उत्तर प्रदेश) असे मयत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे खेर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमा देवी सध्या खेर्डी भरणवाडी, चिपळूण येथे वास्तव्यास होती. १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तिने आपल्या राहत्या खोलीत पंख्याला नायलॉनच्या रस्सीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, प्राथमिक तपासणीत मृत्यूचे कारण ‘गळफास’ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. क्र. ४५/२०२६) करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.