कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
संदीप मेस्त्री आणि अनिकेत सुपल ठरले मानकरी
रत्नागिरी :
रत्नागिरीतील अत्यंत लोकप्रिय आणि मानाच्या “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा” दिमाखदार निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा या स्पर्धेत प्रथमच “चलचित्र” आणि “आरास-सजावट” असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
आयोजक कांचन मालगुंडकर यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, “चलचित्र” विभागात सड्येवाडी-जयगड येथील संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी साकारलेल्या “श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रगटावतार” या चलचित्र देखाव्याने प्रथम क्रमांक पटकावला. तर “आरास / सजावट” विभागात सह्याद्रीनगर-नाचणे येथील अनिकेत सूर्यकांत सुपल यांच्या “बारा ज्योतिर्लिंग” सजावटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रमुख विजेत्यांमध्ये चलचित्र विभागात
प्रथम क्रमांक संदीप मेस्त्री (सड्येवाडी-जयगड) यांच्या श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रगटावतार याला तर द्वितीय क्रमांक मयूर सुरेश भितळे (सोमेश्वर) – हिरकणी देखाव्याला याशिवाय तृतीय क्रमांक दीपक मेस्त्री (मिरजोळे) – भक्त पुंडलिक या देखाव्याला मिळाला. आरास विभागात
प्रथम क्रमांक: अनिकेत सुपल (सह्याद्रीनगर – नाचणे) – बारा ज्योतिर्लिंग यांना
द्वितीय क्रमांक स्वप्नील ठिक (तिवंडेवाडी-शिरगाव) ग्रामीण घर – वारली पेंटिंग यांना तर
तृतीय क्रमांक अजय पारकर (मावळंगे-गजनेवाडी) – दगडावर चित्रकला यांना गौरवण्यात आले याशिवाय
सुबक मूर्तिकार या श्रेणीत वैभव लिंगायत यांना राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती यांचा सन्मान करण्यात आला.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांचे या स्पर्धेला भक्कम पाठबळ लाभले. तसेच, रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
ग्रामीण भागातील बिकट वाटा तुडवत, दिवस-रात्र मेहनत घेऊन परीक्षकांच्या चमूने प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊन काटेकोरपणे परीक्षण केले. यामध्ये कांचन मालगुंडकर, अभिजीत नांदगावकर, नरेंद्र पाटील, विजय पाडावे, मुकुंद विलणकर यांच्यासह १२ जणांच्या पथकाने परीक्षण कार्य पार पाडले.
सर्व विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, बक्षीस वितरण सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.