रत्नागिरीत श्री राधा-कृष्ण सजावट स्पर्धा
बालगोपाळांसाठी पर्वणी, ३ सप्टेंबर रोजी आयोजन
रत्नागिरी:
गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून, प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्यातर्फे ‘राधा कृष्ण सजावट स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुला-मुलींसाठी खुली असणार आहे.
येत्या ३ सप्टेंबर रोजी गुरुवार सायंकाळी ६:३० वाजता पटवर्धन हायस्कूलमधील कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृहात ही स्पर्धा पार पडेल. स्पर्धकांनी निर्धारित वेळेच्या ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
स्पर्धेतोत्साह वाढवण्यासाठी आकर्षक रोख रकमेची पारितोषिके आणि सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम पारितोषिक रु. ३००१/- + सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. २००१/- + सन्मानचिन्ह,
तृतीय पारितोषिक रु. १००१/- + सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ पारितोषिके (दोन): प्रत्येकी रु. ५०१/- + सन्मानचिन्ह या पारितोषिकांचा समावेश आहे.
तसेच बालगटासाठी विशेष उल्लेखनीय बक्षिसे देखील जाहीर करण्यात आली असून, उत्कृष्ट कृष्ण आणि उत्कृष्ट राधा ठरणाऱ्या बालकलाकारांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच बालकांना प्रशस्तीपत्रक प्रदान केले जाईल. स्पर्धेचे सर्व अधिकार आणि निर्णय परीक्षक व आयोजकांकडे राखीव राहतील.
स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी किंवा स्पर्धकांनी ९५६१८ २२०३७ किंवा ९९७५१ ६९६०९ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक नगरसेवक अमित वसंत विलणकर यांनी केले आहे.