लाचखोर मंडल अधिकाऱ्याला न्यायालयीन कोठडी
चिपळूण:- सावर्डे येथे पाच हजाराची लाच घेतल्या प्रकरणी अटक असलेल्या मंडल अधिकारी अनिल दिलीप जाधव याला शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
अनिल जाधव याला लाच खोरी प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडल्या नंतर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आले होते. न्यायालयात त्याला हजर केल्यावर एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज शुक्रवारी कोठडी संपल्यावर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.