पाली येथे गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः तालुक्यातील पाली येथील नवीन वसाहत मुंबई-गोवा हायवेलगत जंगलमय भागात विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ६५० रुपयांची १५ लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विश्वनाथ मावळंकर (वय ३०, रा. खानू, गवंडीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलिस हवालदार भैरवनाथ सवाईराम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिता तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.