कोदवली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दारूच्या व्यसनामुळे टोकाचे पाऊल
राजापूर:
राजापूर तालुक्यातील कोदवली (आगरवाडी) येथे दारूच्या व्यसनामुळे आलेल्या नैरा्यातून एका ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जुलै रोजी रात्री ९ वाजता कोदवली आगरवाडी (ता. राजापूर) येथे घडली. या प्रकरणाची नोंद २७ जुलै रोजी पहाटे २.१० वाजता राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
मृत तरुण संदीप मनोहर गिजम (वय ३८, रा. कोदवली आगरवाडी, ता. राजापूर) हा दारूच्या अतिव्यसनामुळे त्रस्त होता. दारूचे व्यसन जडल्यामुळे त्याचे लग्न जुळत नव्हते, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. यातूनच तो मागील पाच-सहा दिवसांपासून सतत जास्त प्रमाणात दारू प्राशन करत होता.
घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत असताना त्याने आपल्या राहत्या घरच्या किचनमधील लाकडी बारला साडीच्या साहाय्याने स्वतःहून गळफास लावून घेतला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.