जांभारी गावठी हात बॉम्ब प्रकरणी संगमेश्वर मधून एकाला अटक
दोन दिवसांची पोलीस कोठडी, आरोपी संगमेश्वर तालुक्यातील
रत्नागिरी : जयगड जांभारी येथील गावठी हात बॉम्ब प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी संगमेश्वर तालुक्यातील असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जयगड पोलीस ठाणे हद्दीमधील जांभारी गावात गावठी हात बॉम्ब फुटल्याने एका महिलेच्या हाताची बोटे तुटल्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने जयगड पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २८/२०२६ मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांकडून तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका आरोपीचे नाव समजले. संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथील अविनाश गोपीनाथ खेडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी आरोपी निष्पन्न करण्याच्या शोधात पोलिस आहेत. तपास प्रभारी ए. पी. आय. संजय पाटील करत आहेत.