
गांजा विक्री करणाऱ्या महिलेला पोलिस कोठडी
चिपळूण : सावर्डे येथे गांजा विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तिच्याकडून १ लाख १८ हजार १६० रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
खेर्डी बाजारपेठेतील टपरी विक्रेत्याकडून गांजाच्या ११ पुड्या जप्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी सावर्डे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेत तिच्या घरातून पाच किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. खेर्डी माळेवाडी येथील रहिवासी असलेला साईराज कदम याच्या चौकशीत गांजाच्या ५० ग्रॅम वजनाच्या ११ पुड्या शुक्रवारी आढळून आल्या.
सुमारे २२०० रुपयांचा गांजा जप्त केला. त्यानंतर सावर्डेत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ९ चिपळूण पोलिसांनी साईनाथ कदम याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता तो मिनाक्षी बाळू जयस्वाल (वय ५१, सावर्डे बाजारपेठ) यांच्याकडून गांजा विकत घेत असल्याचे स्पष्ट झाले. चिपळूण पोलिसांनी या संदर्भातील माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवली होती. साईराज कदम याची न्यायालयीन प्रक्रिया आटोपल्यानंतर चिपळूण पोलिस सावर्डे येथे त्या महिलेच्या घरावर धाड टाकणार होते.