
झारखंडच्या तरूणाचा दापोलीत मृत्यू
दापोली : दापोली येथे सध्या कामानिमित्त आलेल्या झारखंड येथील दारूच्या नशेत झोपलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास सागरकुमार चंद्रकुमार मेहता ३५ रा. रामचंद्र माहती फुरखा हजारीबाग रा. झारखंड हे दारूचे नशेमध्ये राहत्या ठिकाणी भारतनगर येथील एका लॉजसमोर झोपलेल्या स्थितीत आढळले. सागरकुमार यांचा चुलतभाऊ हा जेवण करण्यासाठी उठवायला गेला असता सागरकुमार हे काहीही हालचाल करत नसल्याचे आढळून आले. म्हणून त्यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागरकुमार यांना मृत घोषित केले. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.