
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी :शहरातील रत्नागिरी रेल्वेस्टेशन स्टॉपच्या मागील बाजुस तसेच सुरेशा पॉईंट येथील मोकळ्या जागेत मद्य प्राशन करण्याऱ्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन सुभाष फोडेकर आणि सुयोग शशिकांत सुवरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता.२५) सायंकाळी सात ते रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांकडे मद्य प्राशनाचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्याच्या बाटल्या पुढ्यात ठेवून मद्य प्राशन करताना सापडले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश तटकरी व अमेल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.