
संगमेश्वर आंबेड खुर्द येथे दोन दुचाकींचा अपघात, 4 जखमी, 2 गंभीर
संगमेश्वर :मुंबई – गोवा महामार्गावरील आंबेड खुर्द येथे दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले असून दोघांची पकृती गंभीर आहे. विश्वास नारायण मेस्त्राr (50, धामणी, सुतारवाडी, संगमेश्वर), संदीप तुकाराम पांचाळ (50, राजवाडी, संगमेश्वर), जयेश शशिकांत नाचरे (25, आरवली, नाचरेवाडी, संगमेश्वर), यश दत्ताराम बने (24, आरवली राजवाडी, संगमेश्वर) अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत. या दोघांनाही रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शनिवार 25 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. विश्वास नारायण मेस्त्राr (50, धामणी, सुतारवाडी) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास नारायण मेस्त्राr हे आपल्या ताब्यातील युनिकॉर्न (एमएच08 एके3453) दुचाकीवरुन संदीप पांचाळ याला घेऊन असुर्डेच्या दिशेने चालले होते. मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना आंबेड खुर्द तांबेडीवाडी येथे आले असताना संगमेश्वरहून मुंबईच्या दिशेने हॉरनॅट गाडी (एमएच 08, एयु-7719) गाडीवरील चालक जयेश नाचरे याने विश्वास मेस्त्राr यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघेजण जखमी झाले. त्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. एस. शिंदे करत आहेत.