
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गांवर २४ तास आपत्कालीन मदत पथके
रत्नागिरी :रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर आगामी पावसाळयामुळे येणाऱ्या विविध समस्या, चौपदरीकरणाचे दरम्याने निर्माण झालेल्या समस्या, प्रलंबित कामे, अतिपर्जन्यवृष्टी मुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन समस्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आढावा घेण्यात आला व त्याठिकाणी तात्काळ विविध उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे बाबत तसेच महामार्गावर होणारे दुर्घटनांचे वेळी नागरीकांना तात्काळ मदत मिळावी याकरता महामार्गावर ठिकठिकाणी २४ तास सर्व साधनसामुग्रीसह आपतकालीन मदत पथक नेमणे बाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार यांना महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या आहेत.
राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह यांचे आदेशानुसार महामार्ग पोलीस अधीक्षक रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले यांचे मार्गदर्शनाखाली काल महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र पोलीस पोलीस उपअधिक्षक घनःश्याम पलंगे यांनी मुंबई-गोवा, रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच इतर राज्य महामार्गावर आगामी पावसाळयापुर्वी करावयाच्या उपाययोजना बाबत रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील महामार्ग पोलीस मदत केंद्र प्रभारी अधिकारी व महामार्ग चौपदरीकरण, दुरुस्ती व देखभाल करणारे संबंधीत विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांची रत्नागिरी येथे बैठक घेतली.
या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे यांनी सांगितले की,
पहाणी करुन महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी ते बुजवून घ्यावे. तसेच ज्या ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आलेले आहे त्याठिकाणी पक्का डांबरी रोड करावा. सदरचा रोड पुर्णपणे मातीचा असल्याने तो रोड पाऊस सुरु झाल्यानंतर वाहने अडकून पडणार नाहीत. महामार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुला पाणी जाणेकरीता नाला निर्मिती करणे आवश्यक आहे. अन्यथा रोडवर पाणी व माती येण्याची शक्यता आहे.महामार्गावर ज्याठिकाणी नवीन रस्त्याची ऊंची वाढविण्यात आलेली आहे त्याठिकाणी चालु रस्त्यावर पावसामुळे माती वाहुन येण्याची शक्यता असल्याने सँड बॅग लावण्यात याव्यात.मुख्य रस्त्यांच्या साईड पट्टया भरुन घेणे व त्या रोलींग करुन मजबुतीकरण करुन घ्यावे शक्य झाल्यास डांबरीकरण करावे.
महामार्गावरील रस्ता दुभाजक पट्टा व वळणावरील साईडचे पांढरे पट्टे ठरावीक ठिकाणी अस्पष्ट झालेले असुन रस्ता दुभाजक पट्टा, पांढरा पट्टा व साईड पट्ट्या रंगवून घ्याव्यात. तसेच रस्त्याचे दोन्ही बाजुला रोड निश्चिती होणेकरीता डेलीनेटर व सेंडवेंगचा वापर करावा.ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे किंवा रस्ता,पुल खचला जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी फ्लड लाईट लावावेत. तसेच रस्त्यालगत असणारे जुनाट व महाकाय वृक्ष उन्मळून पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची खात्री करुन ते तोडून घ्यावेत.स्पीड ब्रेकर्स अथवा रम्बर्स टाकण्यात यावेत.पावसाळ्यात महामार्गावर आपत्कालीन परिस्थिती उद्भावल्यास त्या त्या कार्यक्षेत्रानुसार आपली आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवावी. कार्यक्षेत्रानुसार गस्ती पथके तयार करुन उपलब्ध साधन सामुग्री तयार ठेवावी.तसेच महात्वाचे ठिकाणी चालकासह क्रेन, जेसीबी उपलब्ध करुन ठेवावा जेणे करुन एखादेवेळी अप्रिय घटना घडल्यास सदर ठिकाणी तात्काळ पोहचता येईल व मदत करता येईल. तसेच त्यांचे संपर्क क्रमांक संबधीत पोलीस ठाणे तसेच वाहतुक मदत केंद्र येथे कळविणेत यावेत.
यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी व रस्ते दुरुस्ती व देखभाल करणारे संबंधीत विभागाचे अधिकारी तसेच रस्ते चौपदरीकरण करणारे संबंधीत ठेकेदार यांचे प्रतिनिधी यांची ओळख करुन घेतली. या बैठकीला म.सु.प. रत्नागिरी विभाग पोलीस निरीक्षक रेश्मा कुंभार, म.पो. केंद्र हातखंबा,चिपळूण सहा. पोलीस निरीक्षक विक्रमसिंह पाटील,म.पो. केंद्र कसाल कणकवली पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण ए. एस. शिवनीवार, राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी अभियंता शिवजी जांबळे, अजिंक्य चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग, सावंतवाडी रुपेश कांबळे, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभाग व्ही.एन.पाटील, कंत्राटदार कंपनीचे अशोककुमार पांडे, वाय. एस. राव,सिध्दलिंग शिरोळे, उत्कर्ष कावनकर, अजिंक्य जाधव,आनंद विचकुंडे, रोहीत इनारकर,अनिल सराफ, जयंतीलाल नानचा,एस.जी. ललीत,शशिकांत कुमार, प्रसाद चव्हाण, प्रफुल्ल देसाई, पी.आर. बाबला,रविंद्र गायकवाड उपस्थित होते. बैठकीला उपस्थित राहील्याबद्दल पोलीस निरीक्षक रेश्मा कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच १५ दिवसांनी पुन्हा केलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.