
गांजा बाळगणाऱ्या दुसऱ्या संशयिताची जामिनावर सुटका
खेड : खेड शहरातील नगर परिषद वसाहतीजवळील साई मंदिर परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, रा. कातळआळी खेड) याची जामिनावर सुटका झालेली असतानाच या प्रकरणात सहभाग असलेल्या मुकेश विश्राम दोरकर याचीही जामिनावर मुक्तता झाली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या प्रथमेश कानडे याच्याकडून १७ हजार ५१३ रूपये किंमतीचा गांजासह इतर माल जप्त करून अटक केली होती. त्याने हा गांजा महाड तालुक्यातील बडवली येथील मुकेश विश्राम दोडकर (३३) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिल्यानंतर त्यालाही येथील पोलिसांनी गजाआड केले होते. गांजा विक्री प्रकरणाचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता होती. मात्र पोलीस तपासात आणखी काहीही निष्पन्न झाले नाही.