
पवारवाडी येथील बंधाऱ्यात आढळला वृध्दाचा मृतदेह
रत्नागिरी:- म्हामुरवाडीतील वृद्ध घरातून कोणालाही न सांगता गेलेला वृद्ध तालुक्यातील पवारवाडी येथील शेती संरक्षण बंधाऱ्यालगत मृतावस्थेत आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवाकर सदाशिव शिवलकर (वय ६०, रा. म्हामुरवाडी, पो. मजगाव, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
सदर घटना शुक्रवारी (ता. २४) रात्री नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर शिवलकर हे घरात कुणालाही न सांगता रात्री नऊच्या सुमारास निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता केळ्ये पवारवाडी येथील शेती संरक्षण बंधाऱ्यालगतच्या पात्रात शनिवारी (ता. २५) पाचच्या सुमारास मृतावस्थेत आढळले. या प्रकरणी नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.