
कोंकण रेल्वेची रोरो सेवा सक्षम करणार: महाव्यवस्थापक
चिपळूण :- कोंकण रेल्वेच्या चिपळूण सहित रोहा- माणगाव-रत्नागिरी आणि कणकवली येथील सर्वच रेल्वे रूळ किंवा प्लॅटफॉर्म वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच रेल्वेची रोरो सेवा या सर्वच रेल्वे स्थानकादरम्यान सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वेच्या कार्यकारी व्यवसथापकांनी सांगितले . गेले काही वर्षे रोरो सेवा अधिक सक्षम आणि सोयीची व्हावी अशी मागणी होत होती ,
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत साहजिकच माल वाहातुकीसाठी सक्षम पर्याय हवेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे, याबरोबरच रेल्वे सेवाही अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले .रेल्वेचे दुपदरीकरण इलेट्रीफिकेशन झाले आता रोरोसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . रायगड जिल्ह्यात रोरो साठी प्लॅटफॉर्म आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही सुविधा नाही .आता चिपळूण रत्नागिरी आणि कणकवली आणि मडगाव येथे असा प्लॅटफॉर्म तयार करून प्रत्येक जिल्ह्यात रोरो सेवा कार्यरत करण्याचे पुढील तीन वर्षांत उद्दिष्ट असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले , रत्नागिरी जिल्ह्यात 1000 छोटे आणि मोठे उद्योग आहेत तर या ठिकाणाहून देशात सुमारे 1000 ट्रक कार्यरत आहेत.
या रोरो सेवेमुळे अपघाताचा धोका कमी होतो तसेच डिझेल आणि वेळेची बचत होते , प्रवासाचा आणि कामाचा त्रास वाचतो यामुळे ही सेवा महत्वाची आणि उपयुक्त आणि रेल्वेला फायदेशीर आहे .रेल्वेने ही सेवा सक्षम करण्याचा निर्णय घेतल्याने मालगाडी उत्पन्न वाढेल . यासाठी रेल्वेचे सगळे प्लॅटफॉर्म कार्यरत करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे . कोंकण रेल्वेची अपुरी असणारी सगळी कामे सुरू केली आहेत तसेच मेंटेनन्स साठी विशेष मोहिमही सुरू केली आहे असे महाव्यवस्थापकांनी सांगितले