
मालगुंड खाडीकिनारी व्हेल माशाचे दफन
गणपतीपुळे :येथे गेले सुमारे तीन चार दिवस चर्चेचा विषय असणाऱ्या व्हेल माशाचे ऑपरेशन ब्लू व्हेल नंतर सदरचा व्हेल मासा मृतावस्थेत गणपतीपुळे येथील पर्यटन निवास महामंडळाच्या बांबू हाऊस परिसरातील समुद्रावर काल गुरुवार दिनांक 15 रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी दिसून आला.
याबाबत सविस्तर वृत्त असेही गणपतीपुळे तीर्थक्षेत्र गेले तीन दिवस व्हेल माशाचे पिल्लू समुद्रकिनारी लागले होते प्रथमतः वनविभाग एमटीडीसी स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याकडून प्राथमिक प्रयत्न करून समुद्रामध्ये सोडण्याचा प्रयत्न चालला होता. सदरच्या पिल्लाला सुमारे दोन ते तीन वेळा पाण्यात सोडण्यात आले मात्र १४ तारखेला सकाळीच हे पिल्लू पुन्हा एनटीडीसीच्या बांबू हाऊस जवळ समुद्राच्या छोट्याशा पाण्यात दिसून आले भरती ओसरल्यानंतर समुद्राचे पाणी खाली गेल्यानंतर कर्मचारी गणपतीपुळे ग्रामपंचायत जीव रक्षक यांच्याकडून बादलीने पाण्याचा मारा या माशावर करण्यात येत होता जेणेकरून हा मासा जिवंत राहावा यासाठी सारीच यंत्रणा कामाला लागली होती.
१४ तारखेला सकाळी पुणे येथून रेस्क्यू टीम आल्यानंतर सदरच्या माशाला आठ ते दहा सलाईन तसेच काही अँटीबायोटिक इंजेक्शन मारल्यानंतर सदरचा मासा खायाला रात्री ट्रॉलीच्या साहय्याने समुद्राच्या खोल पाण्यात सोडण्यात आला होता मात्र १५ तारखेला सायंकाळी 5:30 वाजता सदरचा मासा हा मृत अवस्थेत गणपतीपुळे समुद्रकिनारी एमपीडीसीच्या बांबू जवळ आढळून आला रात्रीच्या भरतीच्या पाण्याने सदरचा मासा गणपतीपुळे खाडी तोंडातून मालगुंड खाडी किनारी लागला त्यानंतर वनविभाग स्थानिक पोलीस प्रशासन ग्रामपंचायत गणपतीपुळे ग्रामपंचायत मालगुंड त्याने अतिशय मेहनत घेत सदर माशाचे दफन करण्याचे काम करण्यात आले
गोव्याचे डॉक्टर मनीष रॉय नितेश फर्नांडिस डॉक्टर मार्कर विनिता यांच्यासह यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सदर माशाच्या शवविच्छेदना साठी उपस्थित होते.
यावेळी वनविभागाचे अधिकारी जयघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील गणपतीपुळ्याचे पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण पोलीस नाईक जयेश कीर; गणपतीपुळे ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रवीण चौधरी तसेच ग्रामपंचायत जीवरक्षक ग्रामपंचायत कर्मचारी मिलिंद माने तसेच ग्रामपंचायत मालगुंडच्या सरपंच सौ श्वेता खेवूर; मिलिंद सुर्वे अधिक कर्मचारी उपस्थित होते.
सायंकाळी साडे सहा वाजता सदरच्या माशाला मालगुंड खाडीकिनारी दोन जेसीबीच्या साह्याने वाळूमध्ये सुमारे 30 फुटाचा खड्डा काढून दफन करण्यात आले.