
सावर्डेत आमदार शेखर निकमांचे ‘मिशन बंधारे
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ९५ लाखांचे तीन बंधारे
चिपळूण: तालुक्यातील सावर्डे कुंभारवाडी ओवळीचा डोह येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार परिसरातील जवळजवळ दहा ते पंधरा विहिरींचा पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून आमदार शेखरजी निकम यांच्या विशेष प्रयत्नाने नुकताच काँक्रीट बंधारा बांधण्यात आला.
या बंधाऱ्यामध्ये सद्यपरिस्थितीत दहा ते बारा फूट पाणीसाठा असून त्याचा उपयोग बंधाऱ्याच्या वरच्या दहा ते बारा विहिरींना तसेच बंधाऱ्याच्या खालील तीन ते चार विहिरींना होणार आहे. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या शासनाच्या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आमदार शेखर निकम यांच्या विशेष प्रयत्नाने सदरचा बंधारा पूर्ण झाला आहे. भविष्यात पाणीसाठा वाढविण्यासाठी ठिकठिकाणी असे बंधारे बांधणे गरजेचे आहे, असे आ. निकम यांनी यावेळी सांगितले.