
लायन्स क्लब रत्नागिरीच्या वतीने जलद चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी च्या वतीने जलद चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेह जनजागृती साठी लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. मधुमेह नियंत्रण करण्यासाठी आहाराइतकेच व्यायामाला देखील महत्त्व आहे. सर्वात सहज, सोपा, विनाखर्चीक आणि सर्वांना करता येईल असा व्यायामप्रकार म्हणजे चालणे. चालण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लायन्स क्लब रत्नागिरी आयोजित आणि लायन्स क्लब संगमेश्वर, लायन्स क्लब हातखंबा रॉयल, लायन्स क्लब देवरुख, लायन्स क्लब न्यू रत्नागिरी सहआयोजित पॉवर्ड बाय समर्थ इन्व्हेस्टमेंट रत्नागिरी येथे जलद चालण्याची स्पर्धा म्हणजेच WALKATHON आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी भाट्ये बीच येथे सकाळी ६:३० ते ८:३० या वेळात घेण्यात येणार आहे.
स्पर्धेची सुरुवात झरीविनायक मंदिर येथील समुद्र किनाऱ्यावर होईल. तेथून भाट्ये पुलाजवळील समुद्र किनाऱ्या पर्यंत जाऊन परत फिरून पुन्हा झरीविनायक समुद्र किनारा येथे आल्यावर तीन किलोमीटर अंतर पूर्ण होऊन स्पर्धा समाप्त होईल. स्पर्धा तीन वयोगटात घेण्यात येईल. स्पर्धा संपल्यावर लगेचच बक्षीस वितरण करण्यात येईल.
सर्व स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात येणार असून सर्व स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमधे ४०+ महिलांसाठी, पुरुष ४०+, ५०, ६०+ असे वयोगट करण्यात आले आहेत. विजयी स्पर्धकांना कॅश प्राईज, मेडल, सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
तसेच सर्व सहभागींना सहभाग सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
तरी रत्नागिरीकर नागरीकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी लायन डॉ. सचिन पानवलकर 7588918457, लायन संजय पटवर्धन 8411888233 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.