
श्री शिवशंभू मित्रमंडळ, सावंत बंधूनी साकारली “श्री वसंत गड किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती
रत्नागिरी :दिवाळीत आकर्षण असते ते कील्यांच्या प्रतिकृतीचे. अशीच “श्री वसंत गड किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे ती साळवी स्टॉप येथे सावंत बंधूनी. हा किल्ला पाहण्यासाठी अनेकजणांनी हजेरी लावली आहे.
श्री शिवशंभू मित्रमंडळ, गौरव सावंत बंधू आणि मित्रपरिवाराने दिपावलीनिमित्त छत्रपती नगर नाचणे रोड साळवी स्टॉप येथे “श्री वसंत गड किल्याची” भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे. शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शैलश सणस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून किल्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे, उद्योजक सौरभ मलुष्टे, पपू सुर्वे, अविनाश भोसले व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
या किल्ल्यावर चंद्रसेन मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, साच तलाव, कृष्णतलाव, कोयना तलाव, दीपमाळ, कचेरी कार्यालय, समाद्या, हौद, तटबंदी, सौचकूप, महादरवाजा, ध्वज बुरुज, टाके, प्रवेशद्वार, तोफा, शिवरायांचीअश्वरूढ मूर्ती, हौद, तुळशीवृंदावन अशी सजावट करण्यात आली आहे.
हा किल्ला साकारण्यासाठी शौर्य मांजरेकर, अखिलेश बांबाडे, श्रीयोग चव्हाण, सुधीर मावडी, आदेश शेलार, अथर्व शिंदे, तनिष रेडीज, कुणाल धूंदूर, अभिजित गिरकर, अजय रेडीज, वेदांत सावंत, वैभव पांचाळ, अथर्व खेडेकर, रवी शाह, विनय कदम, ओंकार ठाकूर , आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, शिवांगी चव्हाण , नेहा सावंत, ऋषी दुधाणे, सिद्धू पुजारी, मनीषा मावडी, अंशिका शिंदे, प्रसाद सावंत, निखिल सावंत, गौरव सावंत,वृश्चिक मुडे ,राजस वने यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
या किल्ल्याची लांबी ३० फूट असून रुंदि २५ फूट आणि उंची ४ फूट आहे. हा किल्ला पाहण्याची वेळ सायं ६ ते रात्रौ ११ वाजे पर्यंत आहे. हा किल्ला त्रिपुरा पोर्णिमे पर्यंत पाहण्यासाठी खुला ठेवण्यात येणार आहे.किल्ला पाहण्यासाठी इतिहास प्रेमी व किल्ला प्रेमींची गर्दी होत आहे.