Sunday August 23, 2026


खेड :गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यावर कारवाईभरणे येथील जाधव कॉम्प्लेक्स व हॉटेल सन्मानच्या पाठीमागे सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुधंद्यावर पोलिसांनी धाड टाकून गावठी दारुसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. हि घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरणे येथील जाधव कॉम्प्लेक्स इमारतीच्या पाठीमागे किशोर दिगंबर चौगुले (४३, रा. वेरळ उगवतवाडी) हा गावठी हातभट्टीची दारु विक्री करत होता. त्याच्या कडून ३० लीटर १ हजार ६२० रुपये किंमतीची दारु जप्त केली. येथून जवळच असलेल्या हॉटेल सन्मानच्या पाठीमागील मोकळ्या जागेत निकेत गंगाधर हंबीर (३३, रा. कळंबणी हंबीरवाडी) हा गावठी हातभट्टीची दारु ३५ लीटर कॅनमधून विक्री करत असताना १ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!