खैर-ए-उम्मत फाऊंडेशन महाराष्ट्रातील आदर्श फाउंडेशन ठरेल :- पालकमंत्री ना.उदय सामंत
खैर-ए-उम्मत फाऊंडेशन मिरकरवाडा आयोजित आरोग्य शिबिर
पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थित संपन्न
रत्नागिरी: येथे खैर-ए-उम्मत फाऊंडेशन मिरकरवाडा यांच्या वतीने स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर रत्नागिरी मिरकडवाडा येथे आयोजित करण्यात आले होते.त्यांचे उदघाट्न पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते सपन्न झाला.हा कार्यक्रम नगर परिषद शाळा नं. 10, मिरकरवाडा येथे पार पडला.
▫️▫️ रत्नागिरीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही जो चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाला पालकमंत्री यां नात्याने शुभेच्छा देतोआणि भविष्यात खैर-ए-उम्मत फाऊंडेशन महाराष्ट्रातील आदर्श फाउंडेशन ठरेल असे मत व्यक्त करतो . या कार्यक्रमावर प्रसंगी देशभक्त मुस्लिम बांधव बघायचे असेल तर माझ्या रत्नागिरीत या असे भावनिक आव्हान ही पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी केले. देश सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ती सेवा अल्लाची सेवा आहे असे मानणारे मुस्लिम बांधव आज माझ्या रत्नागिरीत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे गौरव उद्गार या कार्यक्रमानिमित्त त्यांनी काढले.

या कार्यक्रमाप्रसंगी खैरे उम्मत फाउंडेशनचे अध्यक्ष रहीम अकबर अली, उपाध्यक्ष नुरुद्दीन पटेल, माजी नगरसेवक सुहेल साखरकर, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप,शहर प्रमुख बिपिन बंदरकर, समीर झाली मन्सूर काजी,शकील मुर्तुजा,विजय खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.