प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे : पालकमंत्री
उदय सामंत
रत्नागिरी: आरोग्य चांगले राहिले तर उत्साह येतो, नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहे,असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री मा.उदय सामंत यांनी काढले.
शिवखोल,राजिवडा भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रभागाचे माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू झाल्याचे सामंत यांनी सांगून नगरसेवक पदी नसतानाही सुहेल मुकादम हे गेली दीड वर्षे आपल्या प्रभागातील विकासाची कामे प्रगतीपथावर नेली असून उर्वरित विकासकामांसाठी मी निधीची कमतरता भासू देणार नाही,राजिवडा मच्छीमार्केट साठी रु 50 लाख आजच मंजूर केल्याची घोषणा केली.
हे केंद्र शिवखोल येथील असलम गवाणकर यांचे निवासस्थानी सुरू झाले असून तेथे सर्व उपचार हे मोफत दिले जाणार आहेत याचा लाभ घेण्याचे आवाहन सुहेल मुकादम यांनी केले.याकेंद्राचे उद्घाटन सामंत साहेबांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी राजन शेळके, गटविकास अधिकारी जे पी जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ फुले मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉ अजित पवार, डॉ शर्मा, डॉ गौरवसिंह डागुर, डॉ भक्ती घुडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी इ.10 वी,इ.12 वी,पदवीधर परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्य करणा-या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेचा सन्मान करण्यात आला. शिवाय कोरोना काळात या प्रभागात ज्या आशाताईंनी काम केले त्या आशाताईंचा सत्कार करण्यात आला.शिवाय प्रभागातील नागरिकांचे आभा कार्ड वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवखोल,राजिवडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन शकील गवाणकर यांनी केले.
