शीळ धरणाची एक इंच सोडा एक मिलिमिटर ही उंची वाढवली जाणार :पालकमंत्री ना.उदय सामंत
अधिकाऱ्यांना शीळ धरणाची उंची वाढवण्याची फाईल बंद करण्याचे दिले आदेश
रत्नागिरी :रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे ग्रामपंचायत हद्दीतील शीळ धरणाचा प्रश्न फसवणेवासियांच्या जीवनामरणाचा बनला होता.शीळ धरणाचा प्रस्ताव सरकार दरबारी शासनाच्या मागणी नुसार पाठवण्यात आला होता. या प्रस्तावामुळे फणसवणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठी नाराजी पसरली होती. धरणाची उंची वाढवली जाणार या अनुषंगाने येथील ग्रामस्थांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी फणसवळे वासियांची भेट घेऊन ती धरणाच्या उंची वाढीच्या प्रश्नावरती परदा घातला असुन एक इंच सोडा एक मिली मिटर ही उंची वाढवली जाणार नसल्याचा शब्द पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिला आहे.
▫️ शासनाकडून शीळ धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मागवण्यात आला होता.त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये वेगळे वातावरण निर्माण झाले होते.यांची माहिती पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांना दक्षिण कोरियात असताना मिळाली त्यावेळेस पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी येथील नगरपालिका मुख्यकार्यकारी अधिकारी तुषार बाबर यांना फोन वरून शीळ धरणाच्या उंची धाडवण्याची कार्यवाही तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे कार्यवाही थांबली.आज पालकमंत्री ना.उदयजी सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर फणसवळे ग्रामस्थांशी संपर्क साधात आज त्यांच्या समास्या जाणून घेतल्या आणि ग्रामस्थांची गावात जाऊन चर्चा केली. या समस्या जाणून घेतल्यानंतर तात्काळ शीळ धरणाच्या उंची वाढीचा प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश संबंधित विभागाला पालकमंत्री यांनी दिले आहेत. मी ज्या विभागाचा आमदार आहे आणि ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तेथील लोकांवरती अन्याय होईल अशी कोणतीही पाऊल मी उचलणार नसून शीळ धरणाची उंची वाढवण्याची फाईल आजपासून बंद झाले असल्याचे शब्द पालकमंत्री ना.उदय सामंत यावेळेस ग्रामस्थांना दिला आहे.
▫️ धरणाच्या नावावरती पण राजकारण करणारी लोक तुमच्या गावात जन्माला आली आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता हेच मी तुमचा विभागाचा आमदार असल्याचे माझे दुर्दैव आहे तुम्ही ज्या माणसाला शंभर टक्के मतदान देऊन आमदार बनवला अशा व्यक्ती वरती अविश्वास दाखवणे याची खंत माझ्या मनात आहे. शासनाकडून आलेले पत्र हे सत्य होतं मात्र त्याचं राजकारण करण्याचं काम काही महारतींनी तुमच्या गावांमध्ये केलं त्याना त्यांची योग्य ती जागा दाखवा. काही लोकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे त्या सगळ्यांची जंत्री माझ्याकडे आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागाल तर तुमची जागा मी स्वतः दाखवीन या शब्दात विरोधकांचा पालकमंत्र्यांनी यावेळी समाचार घेतला आहे. तुमच्या गावात धरणाची उंची वाढवण्याचा पत्र लोकांनी वाटून गावामध्ये असंतोष निर्माण केला मात्र याच पालकमंत्र्यांनी तुमच्या गावाच्या संरक्षणासाठी 14 कोटी रुपये मंजूर केला हे पत्र वाटण्याचे धाडस विरोधकांनी का केलं नाही असाही प्रश्न यावेळेस त्यांनी उपस्थित केला. आजच काय यापुढेही शिळ धरणाच्या कोणतीही उंची वाढीचा विषय सरकार दरबारी जाणार नसून या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने शीळ धरण्याचा विषय आजच्या बैठकीत संपला असल्याचे आज पालकमंत्री यांनी जाहीर केले.
यां सभेला माजी बांधकाम सभापती बांबू म्हाप,आंबा व्यापारी काका मुळ्ये,पंताशेठ मुळ्ये,कोंडवाडीचे गावकर सोनू आंबेकर,उपविभागप्रमुख सुमेश आंबेकर ,माजी सरपंच रविंद्र पवार,रविंद्र माने,शरद पड्यार,विश्वास सनगरे ग्रामस्थ सर्व मधलीवाडी,दळवीवाडी,कोंडवाडी ग्रामस्थ रत्नागिरी मुख्यकार्यकारी अधिकारी तुषार बाबर,पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित होते.
