
बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी : प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खाडीत बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 28 जुलै रोजी दुपारी 12 ते 1.45 वा.कालावधीत घडली आहे.
महेश शंकर नाचरे (40,रा.गुहागर,रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत भगवान देवजी पालशेतकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानुसार,महेश नाचरे हे शुक्रवारी दुपारी जयगड खाडीतील बोटीच्या पंख्यात अडकलेले दोर काढून बोटीची डागडुजी करण्याचे काम करत होते.त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.याबाबत जयगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी तेथील रुग्णालयात पाठवला.याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.