
ढोल तश्याच्या गजरात न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेडच्या शाळेत नवागतांचे स्वागत
नवीन विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन केली पहिल्या दिवसाची सुरवात
संगमेश्वर :तालुक्यातील आंबेड येथे असलेल्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेडबु.असलेल्या शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल…
तश्याच्या..गजरात वाजत गाजत करण्यात आले.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरवात केली.यां उपक्रमाचे पालक आणि लोकांनी कौतुक केले.
. ग्रामीण भागात असलेल्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु.यां शाळेचा फायदा अनेक पालकांना होत आहे.संगमेश्वर किंवा रत्नागिरी शिवाय परिसरात दुसरी जवळ शाळा नाही.ग्रामस्थांनां गावं सोडून शैक्षणिक कामासाठी तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाव लागत मात्र आता ग्रामीण भागात ही सोय उपलब्ध झाल्याने लोकांची सोय झाली आहे.त्यांमुळे आता बहुतेक पालक यां शाळेत प्रवेश घेत असुन यां शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा वाजता गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना छोटी भेट वस्तू देण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज,सलाऊद्दीन बोट,सलीम सय्यद,मुख्याध्यापिका नाझीमा बांगी,सुजेन अलजी,सिमरन मालदार,नगमा अलजी,सारा फकीर,फातिमा खान,अकलिमा परदेशी,आजरा शेख आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

