
पालगडमध्ये तब्बल 20 गावठी बॉम्ब जप्त, दापोली पोलिसांची कारवाई
दापोली : दापोली तालुक्यात असलेल्या पालगडमध्ये एका व्यक्तीकडून पोलिसांनी 20 गावठी बॉम्ब जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी रमेश पवार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रमेश पवारला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, दापोली पोलिसांनी दापोली तिट्यावर रमेश पवार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांना या व्यक्तीकडे 20 गावठी बॉम्ब मिळाले आहेत. एका पिशवीमध्ये या व्यक्तीने हे बॉम्ब ठेवले होते. पोलीस या आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली
दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते. त्यावेळी पोलिसांना या प्रकारची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दापोली विसापूर ते महाड रस्त्यावर सोनेरी विनेखिंडमधील गैल कंपनीच्या फलकाजवळ 5 जिवंत बॉम्ब सापडले होते. पोलिसांना गवतात सुपारीच्या आकाराच्या पिवळ्या रंगाचा त्यावर सुतळी दोरा गुंडाळलेले होते. बॉम्ब सापडल्यानंतर पोलिसांनी रत्नागिरी येथील श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथक व नाशपथकाला पाचारण केले होते. दरम्यान या बॉम्ब सापडल्याचा तपास अद्याप चालूच आहे. इतक्यात आज पुन्हा एकदा दापोलीत जिवंत बॉम्ब सापडले आहेत.