
बाळासाहेब पाटणकर यांना भाई वैद्य स्मृति गौरव पुरस्कार
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील येथील ज्येष्ठ पत्रकार तथा ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते श्री बाळासाहेब पाटणकर यांना पुणे येथील ज्ञान फाउंडेशन संस्थेच्यावतीने लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे कुर्डूवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण कोरे यांनाही पत्रकारिता पुरस्कारार्थी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्वर्गीय भाई वैद्य यांच्या जयंती निमित्ताने शनिवार दिनांक 24 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता कॉन्फरन्स हॉल एस एम जोशी फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.
माजी संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून यावेळी आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिजीत वैद्य आणि पुणे महावितरण चे मुख्य अभियंता श्री राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते आणि सचिव सौ. अर्चना मुंद्रा यांनी या भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे