
सुसेरीत तरुणाचा गूढ मृत्यू
खेड:- तालुक्यातील खाडीपट्ट्यातील सुसेरी नं. १ मधील बौद्धवाडीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. तुषार सुनील शिर्के (वय ३२, रा. सुसेरी नं. १ खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा ते रात्री पावणेनऊ वाजता गुरांच्या गोठ्यात घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसेरी नं. १ मधील बौद्धवाडीतील गुरांच्या गोठ्यात तुषार शिर्के हे कपडे काढलेल्या व मृतावस्थेत आढळून आले.