
रत्नागिरी नांदिवडे रस्त्यालगत जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड ते नांदिवडे जाणाऱ्या रस्त्यालगत मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये जुगाराच्या साहित्यासह १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दत्ताराम सोनू मायंगडे (वय २६, रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.२९) सायंकाळी सहाच्या सुमारास नांदिवडे रस्त्यालगत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मायंगडे हा रस्त्यालगत मटका जुगार चालवत असताना पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.