रत्नागिरीतील तरुणीची समुद्रात उडी घेत आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील तरुणीने अज्ञात कारणातून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली.ही घटना रविवार 21 मे रोजी रात्री 8.30 वा.घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किर्ती जयेश बोरकर (19,रा.झाडगाव-मुरुगवाडा मिर्यारोड,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सोमवारी रात्री किर्ती घरात कोठेही दिसून न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती पांढरा समुद्राच्या पाण्यात दिसून आली.नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर आजुबाजुच्या नागरिकांनी तिला पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी तिला तपासून रात्री 11.30 मृत घोषित केले. दरम्यान सतत मोबाईलचा वापर करत असल्याच्या कारणातून तिला आई ओरडली होती.या रागातून तिने रात्री पांढरा समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली का याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.