
दुचाकी अपघात प्रकरणी मृत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
दापोली:- दाभोळ दुचाकी चालवत असताना अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल लक्ष्मण जोशी (रा. वेरळ, ता. मंडणगड) हे ७ मार्चला साकुर्डे येथे त्यांच्या दुचाकीने आले होते. तेथून ते परत जात असताना कांगवई येथे रात्री दुचाकी घसरून ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे २१ मार्चला मृत्यू झाला. बेदरकारपणे दुचाकी चालवून, दुचाकीचा अपघात करून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा मृत पावलेल्या विठ्ठल जोशी यांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक विलास पडयाळ करत आहेत.