
चिपळुणात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण:- चिपळूण शहरातील मुरादपूर परिसरातील अमेय पार्क येथील गुलाब इमारतीमधील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दाबिन मिर्जाहुसेन पिरजादे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (१२) रात्री नऊच्या सुमारास घडली.
येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे; मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दाबिन पिरजादे याच्या घरी कोणीही नव्हते. अशातच त्याने आत्महत्या केली. दाबिन पिरजादे हा युवासेनेचा कार्यकर्ता होता. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच युवासेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते.