मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरी मनसेची स्वाक्षरी मोहीम
रत्नागिरी : मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने मनसे रत्नागिरीच्या वतीने मारुती मंदिर सर्कल रत्नागिरी येथे स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली यावेळी या मोहिमेत रत्नागिरीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. .मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनाम्यासाठी तसेच संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे संपूर्ण निवडणुका प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी आदी प्रमुख मागण्यासाठी मनसेच्या वतीने या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
मनसे रत्नागिरी उप जिल्हाध्यक्ष अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात रत्नागिरी शहर, तालुका मधील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मोहीम राबविली.